तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : नाशिक परिक्षेत्र पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या संकल्पनेतून व नाशिक परिक्षेत्र पोलीस दलाच्यावतीने “कम्युनिटी पोलिसिंग” अंतर्गत सशक्त, सक्षम व सतर्क पोलीस या नवीन अभियानाच्या उपक्रमाला रविवार (दि.१२) डिसेंबर रोजी सुरवात करण्यात आली. या विशेष अभियानाची मुहूर्तमेढ नाशिक ग्रामीण पोलीस दलातील व बागलाण तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे वैभव, वलय व इतिहासाची साक्ष प्राप्त असलेल्या सर्वात जास्त उंचीच्या असलेल्या साल्हेर किल्ल्यावर पोलीस, अधिकारी, अंमलदार यांच्या बरोबर किल्ला चढून दिमाखात रोवण्यात आली.
पोलीस दलांमध्ये सतेजपणा, सतर्कपणा, सक्षमता यावी, पोलिसांनी त्यांचे अखंडित असलेले कर्तव्य पार पाडताना आपले सांभाळणे हा या अभियानाचा संदेश आहे. तर जनतेची व समाजाची सेवा करताना पोलीस दल सक्षम असावे सतर्क व सबळ असावे हा यामागचा उद्देश आहे. पोलीस हा समाजाचा महत्त्वाचा व जबाबदारीचा घटक आहे. सामाजिक प्रश्न, गुन्ह्याची उकल, गुन्हेगारांचा शोध व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलिसांना कायम सशक्त, सक्षम व सतर्क राहणे हे मोठे गरजेचे आहे. पोलीस, अंमलदार सशक्त, सक्षम व सतर्क असतील तर ते आपले कार्य सचोटीने, चोखपणे पार पाडू शकतील.
जिल्ह्यात राबविण्यात येणार अभियान..
अशाच प्रकारचे अभियान नाशिक परिक्षेत्रातिल नाशिक ग्रामीण, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात नियमितपणे राबविण्यात येणार आहे.
सशक्त, सक्षम, सतर्क पोलीस अभियान नागरिकांच्या साहाय्याने कम्युनिस्ट पोलिसिंग अंतर्गत पोलीस महासंचालक संजय पांडे, अप्पर महासंचालक राजेंद्र सिंग त्याचबरोबर विशेष महानिरीक्षक बार्के यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाची सुरक्षा, आरोग्य, गुन्हेगारीचा निपटारा करु शकतो आणि एक चांगला सशक्त, सदृढ समाज तयार करण्यास हातभार लावू शकतो हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
– डॉ. बी. जी. शेखर (विशेष पोलीस महानिरीक्षक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम