कंत्राटी कामगारांना दिलासा ; मात्र टांगती तलवार कायम…!

0
28

नाशिक प्रतिनिधी : कोविड काळात कंत्राती कर्मचारी भरण्यात आले होते. मात्र या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे आदेश प्राप्त झाले होते. जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील 707 आरोग्य विभागातील कंत्राटी सेवकांना काढून टाकण्याचे आदेश जारी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र सध्या तरी त्यांना दिलासा मिळाला आहे.

आज या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली. कोरोनाची रुग्णसंख्या आणि वाढता दर तसेच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आवश्यक त्या सेवकांना तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सध्या कार्यरत ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बैठकीत दिले आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसोबत बैठकीतून दूरध्वनीवरून संवाद साधून या विषयात मार्ग काढला. यामुळे तूर्तास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्यांच्यावर टांगती तलवार कायम असणार आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here