एक्साइज विभागाची मोठी कारवाई लाखोंचा मद्य साठा जप्त

0
47

नाशिक प्रतिनिधी : बनाववट दारूचा सुळसुळाट असून आज नाशिक-त्र्यंबक रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल दहा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई मुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या केंद्रशासित प्रदेशातील बेकायदा मद्याची वाहतूक (illegal liquor transportation) रोखण्यात भरारी पथकाला यश आले आहे. यात एका संशयितासबअटक करण्यात आली असून विक्रम आगाजी साळुंखे (२९ रा.भरतनगर ता.जि.औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

आज पथकाचे दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे (Arun Sutrave) यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून, त्र्यंबकरोडवरून (Trimbakeshwar Road) मोठ्याप्रमाणात केंद्रशासित प्रदेशातील दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

त्यानुसार बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास पथकाने बेळगाव ढगा (Belgaon Dhaga) येथे नाकाबंदी केली असता संशयीत मद्यसाठ्यासह पथकाच्या हाती लागला आहे, पोलीस अधिक तपास करत असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here