एका मौलाने केला चिमुकलीचा विनयभंग

0
19

द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी: अकोला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रहिवासी मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला तात्काळ न्यायालयात नेले असून न्यायालयाने थेट त्याची कोठडीत रवानगी केली आहे. जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोडकेवाडी परिसरातील रहिवासी मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर वय २६ याने त्याच भागातील ७ वर्षीय चिमुकलीला थांबून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्यावर हा निर्घृण अपराध केला.

‘तू कुठल्या मदरशात शिक्षण घेते’, असे विचारणा करून तिच्या अंगाला स्पर्श करून हात धरून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिची आई, वडील आणि काकांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ तसेच पास्को एक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

तसेच न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजाविले. समाजात मौलवी असे कृत्य करत असेल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न यावेळी मुलीच्या आईबाबांनी उपस्थित केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here