द पॉईंट नाऊ ब्युरो : जळगाव जिल्ह्यातील रावेर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जेवणात उडदाची डाळ व भाकरी केली याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी खाटेचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची घटना सोमवारी (ता.२९) सायंकाळी पाल (ता.रावेर) येथे घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी संशयितास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाल (ता.रावेर) येथे गट शेत शिवार गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) नामक रहात होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले. यामुळे संतापून शिवा ने आपल्या बापाला मारण्यास सुरवात केली.
या रागाच्या भरात दिनेशने वडील व बहीणीस चापट बुक्यांनी मारहाण केली. त्याचे वडील तेथून पळून जात होते, ते तेवढ्यात दिनेशने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. याबाबत बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलीस करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम