इमारतीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट, इतर ५ गाड्या जळून खाक

0
37

दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच उष्णतेत वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक बाईकच्य पेट घेण्याच्या बातम्या समोर येत आहे. नाशिक पाथर्डी फाटा येथील आनंदनगर येथे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मंगळवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात बाजूला उभ्या असलेल्या ५ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

पाथर्डी आनंदनगर येथे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे बाईक वाहनतळात उभी होती. मध्यरात्री असाचक इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन जळून कोळसा झाला. वाल्मिक पाटील यांनी ८ महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली होती. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे अन्य रहिवाशांच्या पाच दुचाकीही जळून आगीचा भडका उडाला आहे.

हा स्फोट घडला त्यामुळे सर्व रहिवासी गाढ झोपेत होते. मध्यरात्री एकापाठोपाठ स्फोटाचे आवाज झाले. खडबडून सर्व रहिवासी पाहण्यासाठी खिडक्या, बाल्कनीमध्ये बाहेर आले. त्यावेळी पार्किंगमध्ये जास्त आगीचा उजेड आणि धुराचे लोट बाहेर येताना दिसली. आग लागल्याचे कळताच लगेच  तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या हजर होऊन आग विझविण्याचे प्रयत्न केला. काही वेळाने आग विझवण्यात यश आले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here