इंधन दरवाढीवर आंदोलने करणारे गेले कुठे?

0
167

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : काँग्रेस सरकारच्या काळात थोड्याशा इंधन दरवाढीवर आंदोलने करणारे आता कुठे लपून बसले आहेत, असा उपरोधिक सवाल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधत केला आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशातील पेट्रोल व डिझेलवरील शुल्क कमी केले आहे. या वरून महाराष्ट्रात ऐन दिवाळीत भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय फटाके वाजू लागले आहेत. यातच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला.

केंद्रात काँग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवरून भाजपने त्यावेळी काँग्रेस विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. आंदोलने करणारे भाजपचे नेते आता केंद्रात मंत्रीपदावर दिसून येत आहेत. यावर बाळासाहेब थोरात यांनी चफकलपणे बोट ठेवले. ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात थोड्याशा इंधन दरवाढीवर आंदोलने करणारे आता कुठे लपून बसले आहेत, असा उपरोधिक सवाल थोरात यांनी केला.

केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात आंदोलनातून दरवाढीचा जाब विचारणारे आता कुठे लपून बसले आहेत. पेट्रोल, डिझेल या इंधनाशी निगडीत अर्थव्यवस्थेमुळे महागाई वाढते आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा जरूर ठेवा. मात्र याबाबत केंद्रालाही जाब विचारला पाहिजे असे ,म्हणत त्यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here