आ. दिलीप बनकर यांचा पूरग्रस्तांना “एक हात मदतीचा”

0
24

पिंपळगाव प्रतिनिधी (मुकुंद भडांगेे) : कोकणात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड कोल्हापूर, सांगली,  चिपळूण आदी भागांमध्ये हाहाकार घातला आहे . यात हजारोंच्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले, अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. या भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे .या पूरग्रस्त नागरिकांना देशभरातून मोठ्या प्रमाणात मदत होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदार आमदार , जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष हे आपआपल्या परीने कोकणातील नागरिकांना वस्तू स्वरूपात मदत पाठवत आहे निफाडचे आमदार दिलीपराव बनकर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी नामदार अदितीताई तटकरे यांच्या मागणी नुसार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी या गावातील २५६ कुटूंबाना प्रत्येकी

४ ताटे, ४ वाट्या, ४ डिश, ४ ग्लास, ४ चमचे, १ तवा, १ उलथनी, १ पळी, १ चहाचे भांडे, १ भाजीचे भांडे, १ २ डबे, ६ चहाचे कप असा संपूर्ण १ कुटुंबांचा सेट वाटप करण्यात येणार आहे. ,सदर वस्तू घेऊन बुधवार ४ ऑगस्ट रोजी वाहन रायगड कडे रवाना करण्यात आले या प्रसंगी आमदार दिलीपराव बनकर ,तानाजी बनकर ,सुरेश खोडे , बाळासाहेब बनकर ,विश्वास मोरे,संजय मोरे ,रामभाऊ माळोदे,गणेश बनकर,संपतराव विधाते नंदकुमार सांगळे ,विजय देशमाने ,साहेबराव देशमाने,चंद्रकांत राका , राजेंद्र खोडे ,बापू कडाळे, रवींद्र आवारे शकील मोगल ,बाळासाहेब भुतडा ,उमेद जैन ,बाळा बनकर ,आदीजन उपस्थित होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here