आसारामांच्या आश्रमात गुन्हेगाराला आश्रय ; गुजरात पोलिसांकडून अटक

0
32

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आसाराम बापू यांचे नाशिक येथील आश्रमात गुन्हेगाराने आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या १२ वर्षांपासून फरार म्हणून घोषित असलेल्या गुन्हेगारास गुजरात(gujrat) पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. संशयित हा नाशिकमधील आसाराम बापू आश्रमाचा संचालक आहे.

पोलिसांनी(police) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२ वर्षांपूर्वी संजय किशनकिशोर वैद याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा गुजरातमध्ये दाखल होता. या गुन्हयात वैद हा फरार संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. वैद हा नाशिक(Nashik) आसाराम बापू आश्रमात संचालक म्हणून कार्यरत आहे. काल (दि ०२) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आश्रमातील गायींना खाद्य खरेदी करण्यासाठी आश्रमाचे वाहन क्रमांक एमएक ४८ टी ३०९६ गाडी घेऊन नागसेठीया पशु खाद्य दुकान सेवाकुंद पंचवटी (panchavati) इथे आला होता. यादरम्यान गुजरातच्या चार पोलिसांनी त्यास ताब्यात घेत गुजरातला घेऊन गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

राजेश चंद्रकुमार डावर यांनी वैद यांच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपसांती हे अपहरण नसून गुजरात पोलिसांनी नाशिकच्या पोलिसांना याबाबत कुठलीही माहिती न देता केलेली कारवाई असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here