आश्रमशाळा कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न

0
45

नितीन गुंजाळ

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यची नाशिक प्रकल्पाची महत्त्वाची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.विक्रमजी गायकवाड आणि राज्याध्यक्ष मा.श्री.राजेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभाग नाशिक येथे पार पडली.

सदरील बैठकीत संघटनेची नाशिक प्रकल्पाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर अनुदानित आश्रमशाळांतील कर्मचा-यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्या संघटनेमार्फत प्रशासनापुढे मांडून अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांनी एकजुटीने प्रयत्न करावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत संस्थापक अध्यक्ष मा. श्री.विक्रमजी गायकवाड आणि राज्याध्यक्ष मा.श्री.राजेशजी पाटील यांनी VC द्वारे नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले आणि मार्गदर्शन केले.या बैठकीस राज्य निमंत्रित सदस्य मा.श्री. संजयजी जाधव तसेच मा. श्री.नंदकिशोर जगताप,मा.श्री गोकुळजी राव,मा.श्री.प्रदिपजी ढगे तसेच नाशिक प्रकल्पातील अनुदानित आश्रमशाळांतील कर्मचारी हजर होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here