‘आर्चीच्या’ प्रेमात पडलेल्या ‘परशाची’ निर्घृण हत्त्या

0
17

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका मुलाने आंतरधर्मीय विवाह केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तेलंगणा राज्यातील हैद्राबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सैराट चित्रपटात आंतरजातीय विवाह केल्याने एका दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची स्टोरी दाखवण्यात आली होती. तसाच प्रकार तेलंगणा राज्यात घडला आहे. हैद्राबाद येथील सुरूरनगर भागात एका तरुणाची भर चौकात हत्या करण्यात आली. हिंदू तरुणाने मुस्लिम मुलीशी विवाह केल्याने, हा हत्येचा धक्कादायक प्रकार घडला. तरुणीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने ही हत्या केल्याची कबुली तरुणीने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवविवाहित दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना तरुणाची हत्या करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दरम्यान, या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. सैराट चित्रपटाप्रमाणे हा प्रकार घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here