आपले संविधान,आपला आत्मसन्मान म्हणत मनसेचा संविधान दिवस

0
8

किर्ती आरोटे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यभरात संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.आपले संविधान आपला आत्मसन्मान असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशनुसार राज्यभर मनसैनिकांतर्फे विविध सरकारी कार्यालयांत संविधानाच्या उद्देशपत्रिका भेट देण्यात आल्या.

भारतीय संविधाना बद्दल जन जागृती व्हावी जनतेला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी नव्हे नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याकरिता विविध ठिकाणी हा अभूतपूर्व असा उपक्रम राबविण्यात आला.

पोलिस विभाग, अग्निशामक दल, सरकारी कार्यालयांमध्ये उद्देशपत्रिकेच वाटप केले गेले. पक्षाचे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब, जनहित कक्ष आणि विधी विभाग प्रदेश अध्यक्ष ॲड. श्री. किशोर शिंदे साहेब, सरचिटणीस श्री. संजय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मनसे जनहित कक्ष व विधी विभाग तर्फे भायखळा विधानसभेत संविधान दिवस साजरा करण्यात आला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here