आजपासून नाशिक शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’

0
24

द पॉईंट प्रतिनिधी : भारतात अपघाती मृत्यू होण्याची संख्या मोठी आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे उपाय केले जातात. मात्र अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे मात्र काही नाव घेत नाही.
आता नाशिक शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम नाशिक शहरात सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट नसेल, तर पेट्रोल न देण्याच्या सूचना नाशिक शहरातील पेट्रोल पंपांना करण्यात आल्या आहेत.

नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशान्वये शहरातील सर्व पेट्रोल पंपांना हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक शहरात याआधी देखिल हेल्मेट सक्ती करण्यात आली होती, मात्र नंतर हे सगळे बारगळलेल्या स्थितीत झाले. आता आयुक्त पांडे यांच्या सुचने अनुसार नाशिक शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती आज १५ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहे.

या सक्तीबाबत नाशिककर नागरिकांद्वारे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक शहरात हेल्मेट सक्ती बारगळल्यापासून अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढले होते. त्यामुळे आयुक्त दीपक पांडे यांच्याद्वारे करण्यात आलेला हेल्मेट सक्तीचा निर्णय योग्यच असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आता नाशिक शहरात पेट्रोल घ्यायचे असेल, तर वाहन चालकांना हेल्मेट परिधान करावेच लागेल. परंतु, आता आयुक्त दीपक पांडे यांच्या सुचनेनंतर या उपक्रमाची अंमलबजावणी कशी होते? याचा काही उपयोग होतो का? हे येत्या दिवसातच समजेल.

आता या हेल्मेट सक्तीला नाशिककर किती जुमानतात? याला किती प्रतिसाद देतात? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

अपघात टाळण्याच्या दृष्टीने हेल्मेट सक्ती हा उपक्रम योग्यच आहे. आता नाशिक करांनी देखील या गोष्टीचा विचार करून या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतल्यास, नाशिक शहरातील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे आयुक्त पांडे यांच्या सूचनेचा आणि या उपक्रमाचा योग्य रित्या अंमल होणे गरजेचे आहे. म्हणून नाशिककरांना देखील आता पेट्रोल हवं असेल तर हेल्मेट परिधान करावं लागेल, ही सूचना लक्षात ठेवावी लागेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here