आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धांना दिमाखात सुरुवात

0
41

नाशिक प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक विभाग आंतर महाविद्यालयीन फूटबॉल (मुले) स्पर्धेचे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय तर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियम, नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १४ व १५ डिसेंबर अशा दोन दिवस होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २१ महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी श्री. अविनाश टिळे, नाशिक विभागाचे सचिव डॉ. दीपक जुंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त डॉ. बी. एस. जगदाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, नाशिक विभागातील विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.

सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातून आपले उज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व विशद केले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी महाविद्यालयाने खेळाडूंना सतत प्रोत्साहन देऊन, चांगल्या खेळाडूंना मदत करण्याचा महाविद्यालयाचा सतत प्रयत्न असतो तसेच विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. संतोष पवार, प्रा. अजिंक्य उगले प्रा. किशोर राजगुरू यांनी प्रयत्न केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here