द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यात काल अल्पवयीन प्रेमीयुगलाने देवळ्यातील ‘वेलकम’ हॉटेलमध्ये प्रवेश करत रूम मिळवला. रु.न.4 मध्ये या जोडप्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. व्हॉट्सॲप स्टेटस मित्रांनी बघितल्यानंतर मित्रांनी हॉटेलकडे धाव घेत
उपचारासाठी शासकीय रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने दोघांचेही प्राण वाचले पुढील उपचारासाठी दोघांना मालेगाव येथे पाठवण्यात आले. देवळा शहरातील वेलकम हॉटेल मध्ये ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
अल्पवयीन युवकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो हे सर्व गैरप्रकार सुरू असून पालकांनी देखील आपल्या पाल्यांची काळजी घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी क्लासमध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेत असताना क्लासमधील १८ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवतीची मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या अन प्रेम द्विगुणीत झाले. प्रेमसंबंध सुरू असतानाच दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी गावातील काही लोकांना माहिती पडले असून आपल्यावर पाळत ठेवत आहेत. अल्पवयीन आहोत म्हणून एकमेकांचा विवाह होणार नाही या नैराश्येत होते. दोघांनी आपल्याला सोबत जगता येणार नाही, असा समज करून घेतला. त्यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेत. देवळा शहरातील वेलकम हॉटेलमध्ये गुरुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत तणनाशक हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल….
प्रेमीयुगुलाला खोली देतांना त्यांच्या सामानाची किंवा त्यांच्या जवळील आधारकार्ड अथवा ईतर कोणतेही कागदपत्रांची पडताळणी केली नाही, हॉटेलचे रजिस्टर पाहणीसाठी मागीतले असता त्यांनी ते पाहणी साठी उपलब्ध करून दिले नाही. हॉटेलच्या कोणत्याही रजिस्टर मध्ये त्याबाबत नोंदी घेतलेल्या नसल्याचे आढळून आल्याने हॉटेल व्यवस्थापक दिपक सुभाष आहीरे यांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन करुन प्रेमीयुगुलाला बेकायदेशीर रित्या त्यांच्या हॉटेलमध्ये काही काळ वास्तव्यासाठी दिले होते त्यामुळे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असून शासकीय आदेशाचे उल्लंघन करत त्यांच्या अपराधास सहाय्य केले आहे, म्हणून याप्रकरणी पोलीस नाईक रामदास गवळी यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल व्यवस्थापक दिपक सुभाष आहीरे रा. चिराई ता. बागलाण आणि आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून प्रेमीयुगुलावर कलम ३०९,११४,१८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी आदिंसह पोलीस कर्मचारी करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम