मुकुंद भडांगे (द पॉइंट प्रतिनिधी)
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य असलेले ठिकाण हिवाळा ,थंडीचे वातावरवण असल्यामुळे 4/5 महिने पर्यटक खूप गर्दी करतात, अभयारण्यच्या कुशीत वसलेले चापडगांव येथील शेतकरी अतुल सानप ही व्यक्ती मळ्यात जात असताना त्यांना पावसामुळे बुलबुल पक्ष्याचे घरटे अन 3 अंडी रस्त्यां मध्ये पडलेली दिसली. मग त्यांनी ती व्यवस्थितपणे उचलून त् घरी घेऊन आले. अन त्यांच्या घरा समोरील पेरूच्या झाडावरून ते घरटे अन अंडी व्यवस्थित पणे ठेवली. त्या नंतर दुसऱ्या दिवशी बुलबुल हा पक्षी अंड्याच्या शोधत त्या ठिकाणी आला.
8 दिवसा नंतर त्या अंड्या मधून आज अखेर त्या कोवळ्या पिल्लांनी सुरक्षित जन्म घेतला.
असा तो क्षण बघण्या सारखा होता व कायम आठवणीत राहील समाधान वाटलं की,उद्धवस्त झालेले बुलबुल चा परिवार आज सुरक्षित आहे.
अतुल हा लहानपानापासूनच पक्ष्यांची आवड असणारा युवक.
याअगोदर पण त्यांनी उन्हाळ्यामध्ये तेलाचे डबे कापून त्या डब्याला टाकाऊ पासून टिकाऊ पक्ष्या च्या सोयीस्कर डबे तयार करून त्यामध्ये पाणी व बाजूने धान्य ठेवलेले असायचे. तिथे पण खूप पक्षी तहान व भूक भागून विसावा घ्यायाचे.
पक्षी/प्राणी वाचवा निसर्ग वाचेल. मनुष्यवस्तीमध्ये झाडाझुडपांवर दिसणारा व टोपी घातल्यासारखा वाटणारा लांब शेपटीचा एक पक्षी म्हणजे बुलबुल.
बुलबुल पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या “पॅसेरिफॉर्मिस गणातील पिक्नोनोटिडी” कुलात होतो. ‘पिक्नोनोटस’ प्रजातीतील सर्व पक्ष्यांना सामान्यपणे बुलबुल म्हणतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर असे शास्त्रीय नाव असलेली बुलबुल पक्ष्याची जाती सर्वत्र आढळते. दक्षिण आशियातील भारत, पूर्व श्रीलंका, म्यानमार आणि ईशान्य चीन या ठिकाणी उष्ण प्रदेशात तो निवासी आहे. पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांवर, काही आखाती देशांत आणि न्यूझीलंडमध्ये अलीकडे तो आढळत असून तेथे स्थिरावला आहे. त्याच्या शेपटीच्या बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो, म्हणून त्याला “लालबुड्या बुलबुल (रेड व्हेंटेड बुलबुल)” असेही म्हणतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम