श्वेता वाळुंज: वगिरी एक्स्प्रेसवर दगडफेक करत दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दौलताबाद – पोटूळ स्थानकादरम्यानची ही घटना घडली असून दरम्यान, मोठा अनर्थ टळला आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद – पोटूळ स्थानकादरम्यान एक्स्प्रेसवर अज्ञात चोरट्यांनी रेल्वेवर दगडफेक केली असून रेल्वे रोखण्याचा हा प्रकार घडला. सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत दरोडा टाकून परवाशांचे 2 लाख किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून लुटमार केल्याचा प्रकार घडला आहे.
सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर पोटूळ स्थानकाजवळ सिग्नल बंद दिसले. सिग्नलवर दरोडेखोरांनी कापड बांधले होते. लोको पायलटने स्टेशन मास्तरला याबाबत कळवले. यावेळी 8 ते 9 जणांच्या टोळीने रेल्वेवर तुफान दगडफेक करत प्रवाशांचे मोबाइल, पर्स, काही महिलांचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना घडली.प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली असता अज्ञात सोरटी वेळ काढून निघून गेले.
आजुबाजुचा संपूर्ण परिसर शुकशुकाट असल्याने कुणालाही घटनेची कल्पना नाही. दरोडेखोर रुग्णवाहिकेचा वापर करून आल्याचा संशय आहे. अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला स्टेशनकडे रवाना झाली. घाबरलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येथे निर्माण झाला तर मनमाड येथे पोलिस चौकशी करण्यात आली मनमाड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करणार असल्याचे समोर आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम