नाशिक प्रतिनिधी : सध्या तरुणाई नैराश्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्तच वाढले आहे. शहरातील सावतानगर (Savtanagar) येथे एका अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात फॅनच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना घडल्या नंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली गंगाधर शेळके सावता नगर, गार्गी कॉलेज समोर, नवीन नाशिक राहत्या घरात (दि.१४ ) रात्री 8 : 30 च्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे.
आत्महत्येचे कारण मायर स्पष्ट झालेले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम