सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशन वनसंवर्धन बरोबरच; पक्ष्यांसाठी केली दाणापाण्याची सोय

0
2

राज्यांत उष्णतेचा पारा सतत वाढताना दिसत आहे. या वातावरणात पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शहरातील सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशनने उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय करतात.

सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशनने उन्हाळ्यात दररोज सकाळी दोन तास श्रमदान करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करतात. अनेक घरटे तयार करून धान्य आणि पाणी आई भवानी डोंगरावरील असंख्य झाडांना लावण्यात आल्याने पक्ष्यांची गैरसोय दूर झाली आहे.

वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवकांनी सोनांबे गावाजवळील आई भवानी डोंगर येथे . मागील पाच वर्षांपासून 6000 हून अधिक वृक्षरोपण केले आहे, त्यापैकी 96 टक्क्यांहून अधिक वृक्षरोपे जिवंत आहेत. वृक्षारोपणची काळजी घेण्याबरोबरच येथील पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आले आहेत.

वनप्रस्थचे स्वयंसेवक दत्तात्रय बोराडे यांनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून खास पिण्याच्या पाण्याचे घरटे तयार केले आहे. त्यामुळे या परिसरात पक्ष्यांची किलबिल वाढली असल्याचे दिसून येत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here