Skip to content

साठवलेल्या कांद्यावर माथेफिरूने टाकला युरिया ; जुनी शेमळीत धक्कादायक प्रकार उघडकीस


स्वप्निल अहिरे,
सटाणा प्रतिनिधी : वातावरणाच्या सातत्याच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवड मोठ्या कसरतीने केली. रात्र पहाट करून कांद्यांना पाणी दिले, तरीदेखील सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. उत्पादन कमी आणि त्यात बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असताना कोणीतरी एका माथेफिरू करून नुकसानीच्या घडणाऱ्या घटणांमुळे कांदा साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी कैलास रमेश पवार निम्म्या वाट्याने रामदास धर्डा शेलार यांच्याकडून पाणी घेऊन मोठ्या कष्टाने दोन एकर कांदा लागवड केली होती, दोन दिवसापूर्वी काढलेला कांदा शेतातच गोळा करून कांदा पात टाकून झाकलेला होता. काल रात्री अज्ञात व्यक्तीकडून शेतात गोळा केलेल्या कांद्यावर युरिया टाकून नासाडी करण्याचा प्रयत्न केला. अंदाजे १२० ते १५० क्विंटल कांदा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

शेतात पाणी नसल्याने शेतकऱ्याकडून पाणी घेतले काबाडकष्ट करून कांदा पीक काढले, बाजार भाव नसल्याने शेतात झाकून ठेवला, झाकलेल्या कांद्यावर अज्ञात समाजकंटकांकडून युरिया टाकण्यात आला दोषींवर कडक कारवाई करावी हीच एक युवा शेतकरी कडून अपेक्षा.
कैलास पवार शेतकरी जुनी शेमळी

अशा प्रकारे शेतकरी वर्गाचे नुकसान करणाऱ्या माथेफिरु वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सूर्यभान शेलार पोलीस पाटील जुनी शेमळी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!