Skip to content

सांगलीत टेम्पो आणि वॅगनारचा भीषण अपघात , २ मृत्यू तर ५ जखमी


दिवसेंदिवस गाड्यांचे अपघात आणि दुर्घटना आपल्याला ऐकायला येत आहे. असाच प्रकार सांगली येथील शहरातील आयर्विन पुलावर गाडीचा भीषण अपघात झालाय. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघतात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 5 ते 7 लोक जखमी झाले. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे.

टेम्पोमधील सर्व जण शिरोळला भजन कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात वॅगनार आणि एक टेम्पो भरधाव वेगात असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघतात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 ते 7 लोक जखमी झाले. मृतांमध्ये भजनी मंडळातील एका वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे.
या टेम्पो आणि वॅगनार यांच्या पुढील भागाचं प्रचंड नुकसान झालंय. दोन्ही गाड्यांच्या काचा यात धडकेच फुटल्या. तर गाडीतील प्रवाशांनाही जोरदार हादरा बसला.

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहणांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. . या अपघातात जखमी झालेल्यांना तर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टेम्पोमधून 12 जण शिरोळला भजनाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. भरधाव वेगामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अपघातातील जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!