भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रामक झाली आहे, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्यांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रीने नाव न घेता राज ठाकरेंना खडेबोल सुनावले आहे. मागच्या काही दिवसात अल्टिमेटम देण्यात येत होता, तशी चर्चा होती. पण आम्ही सांगत होतो अशी भाषा करु नका. कारण सरकार हे अल्टिमेटमरवर नाही तर कायद्यानं चालतं आहे़.
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेट वरून राज्यात वातावरण तापले आहे यावरच अजित पवार नाव न घेता टोला लगावत म्हणाले, राज्यात जेवढी धार्मिक स्थळे आहेत त्या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबत नियम घालून दिले आहेत ते लागू आहेत. हे नियम सगळयांना पाळावेच लागणार आहेत. त्यातून कुणालाही सूट देता येणार नाही. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुठेही स्पीकर, वाद्ये वाजविण्यात सुप्रीम कोर्टाने बंदी केली आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
धार्मिक स्थळं बद्दल बोलायचे झाले तर आपल्या ग्रामीण भागात रात्री हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ असतो. शिर्डी संस्थानने सकाळच्या काकड आरती भोंग्याविना सुरु केली. इतके दिवस आम्ही काटेकोरपणे अडथळा न होता हे सगळं सुरु होता. पण आता तो निर्णय घ्यावा लागणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील ज्या धार्मिक स्थळांनी भोंगे लावण्याबाबत अजूनही परवानगी घेतली नाही. कुणीही कुणाच्याही दबावाला बळी न पडू नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी कुणी अल्टिमेटम देण्याची भाषा केली. पण, अशी भाषा कुणी करू नये. कुणी तरी उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरविले त्यावरून काही बोलले. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने असा कोणताही आदेश काढला नव्हता. कुणी विचारेल की याची आधी अंलबजावणी का केली नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एका विशेष समुदायासाठी नाही. त्यामुळे तो आदेश फक्त एका समुदायाने नाही, तर सर्व धर्मांनी पाळणं गरजेचं आहे, अजित पवार यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम