शपथ विधीचा मुहूर्त ठरला! फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार; राजभवनात हालचालींना वेग


मुंबई :   उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटासह सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू असून आजच शपथविधी  होण्याची शक्यता आहे. सायंकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.

गोव्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचले. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. तिथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर आज संध्याकाळी ७ वाजता भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, असे सांगितले जाते. चंद्रकांत पाटील हेदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!