Skip to content

लोहोणेर वसाका रस्त्यावर अपघात ; एक जण ठार


देवळा ; लोहोणेर-कळवण रस्त्यावर वसाका साखर कारखाना व हॉटेल सूर्या दरम्यान गुरुवारी (5 ) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लोहोणेर येथील जगन्नाथ गणपत सोनवणे व त्यांचा मुलगा तन्मय हे पिता पुत्र मोटरसायकलने वसाका साखर कारखान्याच्या दिशेने त्यांच्या घराकडे जात असताना समोरून कळवण हुन लोहोणेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार ( क्रमांक MH 41 V 2846) ने त्यांच्या प्लेटिना मोटरसायकल (क्रमांक MH 41 AW 7559) ला जोरदार धडक दिल्याने या अपघातात तन्मय गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे .

तर जगन्नाथ सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . देवळा पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . जगन्नाथ सोनवणे यांच्या अपघाती निधनाणे लोहोणेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!