Skip to content

रेल्वेने प्रवास करताय ? मग तर ही बातमी वाचाविच लागेल


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाची चौथी लाटे येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच  रेल्वे प्रशासन कडून पुन्हा कोरोना संबंधी जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, मुख्यतः खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्कची सक्ती करण्यात आली आहे.  याशिवाय कोरोनासंबंधित सर्व मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत सोमवारी कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) नीरज शर्मा यांनी पत्र जारी केले आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व विभागीय रेल्वेंना कोविडचे नियम पाळण्याचे निर्देश दिले असून, जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यशिवाय ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रत्येक प्रवाशाला मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, कोरोना रूग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता इतर गोष्टींप्रमाणे रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. तसेच अनेक निर्बंधांमध्ये रेल्वेने शिथीलता दिली होती. त्यानंतर अनेकांनी मास्कसक्ती नसल्याने प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे बंद केले होते.

मात्र, आता पुन्हा देशातील काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,  वाढती रूग्ण संख्या तसेच येत्या काळात कोरोनाच्या चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेने प्रशासनाकडून स्थानकांवर येताना आणि ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!