Skip to content

रायगड येथील डोलवहाळ धरणात बुडून पुण्यातल्या तरुण पर्यटकाचा मृत्यू


रायगड :

कोकणात रायगड जिल्ह्यात कोलाडजवळ असलेल्या डोलवहाळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पर्यटनासाठी आलेला हा तरुण बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान (वय २१ रा. तळेगाव जिल्हा पुणे), मूळचा पश्चिम बंगालमधील कोलकत्याचा राहणारा होता. मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एयाज खान आणि अय्यज खान, मावस बहीण बुशरा हाफीजूर रहमान खान (रा. धारावी, मुंबई) यांच्यासोबत तो डोलवहाळ धरण व परिसरात पर्यटन करण्यासाठी आला होता. कोलाड धरणाखालील नदीच्या पाण्यात असिफ अब्दुल रहमान खान हा पोहण्यासाठी गेला. यावेळी खोल पाण्यात आणि भवऱ्यात अडकून त्याचा बुडून मृत्यू झाला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!