महाराष्ट्र पोलीस कोणताही कार्यक्रम, सण उत्सव प्रत्येक वेळी आपल्या करता सज्ज असतात. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात पोलिसांच्या कामाचे तास पुन्हा वाढवण्यात आले होते. तर आता मुंबई पोलीस दलातील अंमलदार ते सहाय्यक फौजदार यांची आता आठ तासांची डय़ुटी करण्यात आली आहे. यामुळे मुंबई पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी आठ तासांची डय़ुटी होती, परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला पोलीसां करता अंमलदारांसाठी 8 तासांची डय़ुटी सुरू केली. 8 तासांची डय़ुटी सुरू केल्यापासून महिला अंमलदारांच्या कार्यक्षमतेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पोलिस आयुक्तांनी त्याची पाहाणी करता पुरुष अंमलदारांची डय़ुटी देखील 8 तास आणि 16 तास आराम अशी केली आहे.
55 वर्षांवरील तसेच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या अंमलदारांना 12 तास काम आणि 24 तास आराम अशी डय़ुटी देण्यात येणार आहे. मुंबई तसेच पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱया अंमलदारांना 8 तास काम व 16 तास आराम अशी डय़ुटी देण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस ठाण्यापासून 50 किमीपेक्षा लांब अंतरावर राहणाऱया अंमलदारांना 12 तास काम आणि 24 तास आराम अशा डय़ुटीचा पर्याय देण्यात यावा, परंतु अशी डय़ुटी करणाऱयांना साप्ताहिक सुट्टी देण्यात येणार नाही.असे आयुक्तांनी त्यांच्या लेखी आदेशात नमूद केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम