Skip to content

मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांकरता उभारले जाणार २८ नवीन चार्जिंग स्टेशन्स


मुंबई महापालिकेने पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र जागा स्थापन केला आहे. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण तयार केले आहे. याकरिता इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी मुंबईत २८ नवीन स्टेशन्स उभारले जाणार आहेत.

राज्य सरकारने भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण आखले असून त्या अनुषंगाने मुंबई शहरात १,५०० चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासणार आहे. याकरता नवीन बांधकाम इमारतीमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. महापालिकेने ही स्टेशन उभी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगण्यात आले. २५ किलोव्हॅट क्षमतेची ही स्टेशन्स असणार आहेत. इमारतीच्या पार्किंग जागेल पार्किंगसाठी एकूण वाहनतळाच्या २० टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली जाणार आहे.

या धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करता यावी यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी करावा अशी विनंती महापालिकेचा पर्यावरण विभागाने दिली. महापालिका, बेस्ट, महावितरण, टाटा पॉवर, अदानी पॉवर, क्रेडाईप्रमाणे अन्य संस्थांचा सहभाग आहे. सध्या एका मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक वाहनास चार्जिंगसाठी सुमारे २ तासाचा कालावधी लागतो. चार्जिंगच्या आधारे ही वाहने १८० ते २०० किमीपर्यंत प्रवास करु शकतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!