देवळा : महालपाटणे गावात आरोग्य उपकेंद्र उपलब्ध करून घ्यावे ,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य काजल खरोले यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक मनोज बेलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

निवेदनाचा आशय असा की , तालुक्यातील महाल पाटणे हे तीन चार हजाराच्या वर लोकसंख्या असलेले गावं असून, बाजार पेठेचे गाव आहे . गावांत आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे गोर गरीब जनतेची गैरसोय निर्माण झाली आहे .त्याच बरोबर गावात राष्ट्रीय कृत बँकेची शाखा देखील सुरू करण्यात यावी ,अशी मागणी निवेदनात केली आहे . येथील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी देवळा ,सटाणा ,मालेगाव आदी ठिकाणी जावे लागत असून, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे , सागर खरोले , उपसरपंच शांताराम अहिरे,,बाळासाहेब खरोले, अभिमन अहिरे, सरपंच किरण पाटील, भाऊसाहेब अहिरे, वसंत भाटेवाल, उत्तम बच्छाव, अशोक खरोले, मॅचिंद्र शेलार, रवींद्र खरोले , निलेश खरोले, शरद कर्डीवाल , शरद भाटेवाल ,बापूजी घोडले, हेमंत खरोले, नाना नारोळे, चंद्रशेखर नाना, भाऊसाहेब सांखोडे, चिकू अहिरे, सुभाष भाटेवाल, दिलीप खरोले, मुन्ना देवरे, गावनजी बंदरे, आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम