Skip to content

मशिदींवर लाऊडस्पिकर लावणे हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालय


राज्यात काही दिवस मशिदीवरील भोंगे यांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आजच अलाहाबाद हायकोर्टाने मशिदीवर भोंगे बसवणं हा मुलभूत अधिकार नाही अशी टिप्पणी केली आहे. यावर राज्यात आणखी प्रश्न निर्माण होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरु आहे. मशिदींमध्ये लाऊडस्पिकर लावणे हा मूलभूत अधिकार नाही, असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने भोंगे वापरण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. ३ डिसेंबर २०२१ रोजी इरफान नावाच्या इसमाने याचिका दाखल केली होती. बदाऊनच्या बिसौली तहसीलमधील बहवानपूर गावांमधील नूरी मशिदीच्या मुतवल्ली इरफानच्या वतीने ही याचिका दाखल केली होती.

बुधवारी कायद्यानुसार मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरणे हा घटनात्मक अधिकार नाही,” असा आदेश न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठाने दिला. मशिदीमध्ये अजानसाठी भोंग्यांचा वापर मूलभूत अधिकार नाही. न्यायालयाने सांगून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी चुकीची ठरवून अर्ज फेटाळून लावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!