Skip to content

भिमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना जबाबदारी कशी टाळता येईल ? शरद पवारांचा सवाल


मुंबई प्रतिनिधी : सध्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्याच्या राकारणास नवं वळण लागलं आहे . त्यात सुप्रिम कोर्टाने निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असा आदेश दिला आहे . त्यामुळे राज्यात निडणुकीच वातावरण रंगायला सुरुवात होताना पाहायला मिळतेय.

शातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढवणार का ह्यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे . ह्याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे . निवडणुकीसंर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अंर्तगतच दोन मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले . प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे एक मत आहे तर आपण सरकार एकत्र चालवतो त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर ते सरकारच्या दृष्टीने योग्य ठरेल असं दुसरं मत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबोबरीने , भिमा कोरेगावप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना जबाबदारी कशी टाळता येईल असा सवालही त्यांनी यावळी उपस्थित केला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!