प्रभागरचनेला पुन्हा याचिकेद्वारे आव्हान

0
30

प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभागरचनेसंदर्भातील आक्षेपांबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल असतानाच आता पाथर्डी शिवारातील प्रभागरचनेवर आक्षेप घेणारी दुसरी याचिका दाखल झाली आहे.

या याचिकेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस पत्र पाठवून माहिती मागविल्याने प्रभागरचनेच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे प्रशासनाने प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली असतानाच प्रभागरचनेवर आक्षेप घेणारी दुसरी याचिका दाखल झाल्याने प्रभागरचना वादात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कौस्तुभ परांजपे यांनी आक्षेप घेतला होता आणि राज्य निवडणूक आयोगाचे नियम धुडकावल्याची तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेताना त्याची दखल घेऊ असे स्पष्ट केले होते. मात्र, न्यायालयाला सांगूनही कोणत्याही आक्षेपांची दखल घेतली नाही, की सुनावणीनंतर काय निर्णय घेतला हेदेखील कळविले नाही म्हणून परांजपे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या पाठोपाठ आणखी एक याचिका दाखल झाली आहे. त्याची सुनावणी होत नाही तोच आणखी एक याचिका दाखल झाली असून, त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील अडचणी वाढल्या आहेत. पाथर्डी शिवारातील प्रभागरचनेबाबत ही याचिका दाखल झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून तातडीने यासंदर्भातील माहिती मागविली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here