Skip to content

पुण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल


पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वृत्तीचे प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जातो. अशीच एक घटना घडली पुण्यातील खेर्डी येथे 42 वर्षीय महिलेचा भंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील खराडी परिसरात इमारतीच्या जवळ पहाटे दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी चालण्याकरता आलेल्या 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केला. खराडी परिसरात गेरा इम्पेरियाम अल्फा या इमारती समोर रनिंग करत होती. त्यावेळी त्याठिकाणी दुचाकीवरील अनोळखी दोन इसमांपैकी एका इसमाने महिलेच्या पार्श्वभागावर हाताने मारुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यानंतर आरोपी पसार झाले आहे. परिसरात पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे अशा नराधमांना शिक्षा देऊन सांगली खरडपट्टी केली पाहिजे.

याप्रकरणी पिडित महिलेने पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमां विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहणी केली असून संबंधित परिसरातील सीसीटीवही फुटेजची ही तपासणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस सोनवणे करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!