Skip to content

पुणे जिल्ह्यातील कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर


राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताने होणारे मृत्यू दर वाढले आहेत. जिल्ह्यात उन्हाचा फटका वाढल्याने साखर कारखान्यांसाठी काम करणारे मजूर आपल्या गावाकडे निघाले. त्यामुळे अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.आतापर्यंत ११ साखर कारखाने बंद झाले असून आणि उसात इतर कारखाने देखील बंद पडण्याची भीती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी
वर्तवली आहे.

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याने पाणी टंचाईने निर्माण झाली आहे. उष्णतेमुळे विहिरींनी तळ गाठला, जनावरांसाठी आवश्यक खाद्य मिळतं नाही. साखर कारखान्यांनी सहा महिन्यांपासून उसाचे गाळप सुरू केले होते. पुणे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने सहा महिन्यांपासून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात होते. गळीत हंगाम अंतिम टप्प्यांत आला आहे. अनेक कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकांनातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळणार सुरुवात झाली आहे तर पावसाचे चिन्हे दिसू लागली आहेत. बऱ्याच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पसरलेले दिसत आहे. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. हंगाम सुरू होण्याआधी तोडणी मजूर आपल्या गावाकडे जाऊन शेतीसाठी लागणारी मशागतीसाठी त्याची धडपड सुरू आहे. शेतकऱ्यांची ही लगबग सुरू झाल्याने कारखान्यावरील मजुरांची संख्या कमी झाली आणि कारखाने बंद पडण्यास सुरुवात झाली आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!