Skip to content

नाशिक – बांध कोरण्याच्या वादातून पेटवून दिलेल्या त्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू


द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : येवला येथे अंगावर डिझेल टाकून पेटवून दिलेल्या त्या शेतकऱ्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक येथे सूर्योदय रुग्णालयात या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

येवला तालुक्यातील कुसुर येथे दिलीप गायकवाड यांच्या शेताचा बांध फोडून जमीन नांगरल्याने गायकवाड यांनी जाब विचारला असता, संग्राम रामदास मेंगळ, राहुल हिंगे या दोघांनी गायकवाड यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यात गायकवाड 40% भाजले. 1 मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती.

दरम्यान, अखेर दिलीप गायकवाड यांचा नाशिक येथील सूर्योदय या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दहाहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात जमिनीच्या वादातून, त्यातल्या त्यात बांध कोरण्याच्या वादातून आजवर अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मात्र आता जमिनीच्या वादातून एकाला आपला जीवच गमवावा लागला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!