Skip to content

नात्याला काळीमा फासणारी घटना! बारा वर्षीय मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार


शिरुर तालुक्यातील एका पोटच्या बारा वर्षीय मुलीवर बापाने बलात्कार धक्कादायक घटना घडली. शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधमा बापास अटक करण्यात आली आहे.

अरणगाव (ता.शिरुर) येथील हे कुटुंब राहत होते.  रात्री उशिरा बाप दारु पिऊन घरी आलेला असताना त्याने पत्नीशी भांडण करत पत्नीला घराबाहेर काढले. महिला घराबाहेर ओट्यावर अंथरून टाकून झोपली. महिलेची मुले घरात झोपलेली होती. दारूच्या नशेत असलेल्या नराधम बापाने मुलीला दमदाटी करत मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. काही बारा वर्षीय मुलगी रडत रडत घराबाहेर आली.

आईने विचारणा केली असता तिच्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. तात्काळ मुलीच्या आईने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला. शिक्रापूर पोलिसांना घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी सदर नराधम बापावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे, तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!