नागपूरमध्ये संत्री बागायतदार हतबल! फळांच्या गळतीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान

0
3

महाराष्ट्रात नागपूरची संत्री विशेषता त्याच्या अप्रतिम चवीसाठी संपूर्ण देशात ओळखली जातात. या संत्र्यांची मागणी अधिक असते, नागपूरची संत्री परदेशात देखील निर्यात केली जाते. नागपूरमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पन्न हे संत्रा पिकावर अवलंबून आहे.

दर वर्षी त्यांना संत्रा बागेतून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. मात्र यंदाच्या वर्षी नागपूरचे शेतकरी आणि बागायतदार नाराज झाले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे अवकाळी पावसामुळे संत्री आणि मोसंबी च्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.

बागायती शेतकऱ्यांना फळ पिकांवरील नुकसानीचा मोठा फटका बसणार आहे. दररोज बदलणारे वातावरण आणि वारांमुळे संत्री गळून पडली आहेत.संत्री पीक हे वर्षातून दोन वेळा येणारे पिक आहे. आंबिया आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी वर्षभर कमाईचे साधन असते. यंदा डिसेंबर ते जानेवारीदरम्यान आलेल्या आंबिया बहाराचे पीक नेहमीपेक्षा जास्त आले आहे.

अवकाळी पावसाने बागायती शेतीवर अनेक प्रकारचे संकट आले आहे. संत्रा आणि मोसंबीची ही फळे वेळेपूर्वीच गळून पडू लागली आहेत. बुरशी, माल खराब होणे आणि झाडाला कीड लागणे असे अनेक प्रकार यामुळे घडतात. फवारणी करून देखील त्याचा काहीच उपयोग होत नाही लिंबाच्या आकाराची फळे झाल्याने ती गळू लागतात याला काळी फंगस असे देखील म्हणतात. या वेळी शेतकऱ्यांना मालापासून काहीच उत्पन्न होत नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here