Skip to content

नवाब मलिकांना उपचाराकरिता, सत्र न्यायालयाकडून मिळाला दिलासा


नवाब मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत होती. राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतलं. नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.

आर्थर रोड जेलमध्ये अटकेनंतर नवाब मलिक यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. सहा आठवड्यासांठी जामीन मंजूर करण्याचा अर्ज मलिकांच्या वकिलांनी केला होता. अखेर मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना खासगी रूग्णालयात उपचार करण्याची परवानगी देऊन नुकताच दिलासा दिला आहे.

नवाब मलिकांवर कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार आहेत. नवाब मलिकांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळाला नसला तरी खासगी रूग्णालयात उपचार करण्याची मलिकांची मागणी सत्र न्यायालयाने मंजूर केली आहे. तर उपचारांसह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिकांना करावा लागणार आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!