Skip to content

देशात 3275 नवीन कोरोनाबाधित रुग्ण, कोवीड निर्बंध पुन्हा लागू


देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 24 तासांत 3545 नवीन बाधितांची नोंद झाली असून सक्रिय प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. दिल्लीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतात कोविडमुळे ४७ लाख मृत्यू झाले आहेत.

दिल्ली, हरयाणासह काही राज्यांमध्ये कोवीड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे काही राज्यांमध्ये शिथिल केलेले कोवीड निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 117 नवीन रुग्ण आढळले.

यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत 119 बाधित रुग्ण संख्या होती. या काळात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. देशात 3275 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर शुक्रवारी आणखी 270 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,688 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी 27 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 469 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. यासह, देशातील कोरोना आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 5,24,002 वर पोहोचली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,354 नवीन रुग्ण आढळले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!