देवळालीत जुलैपासून प्लास्टिकविरोधात कारवाई

0
3

नाशिक / प्रतिनिधी

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून देवळाली शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. आता केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांवर १ जुलैपासून कडक कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शहरात किराणा, भाजी, दूध दुकांनामध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. याबाबत छावणी परिषद प्रशासनाने आरोग्य विभागास विचारले असता, नुकतीच १३ लोकांवर कारवाई करत २६ हजारांची दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात आले. तसेच गुरुवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दुकानदारांना प्लास्टिकबंदीबाबत सूचना दिल्या आहेत.

 

केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सूचनेनुसार १ जुलै २०२२ पासून कडक कारवाई होणार आहे. १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक फलक, इअर बड स्टिक, बलून स्टिक, मिठाईच्या बॉक्सवर असणारे क्लिंग रॅप्स, आइस्क्रीम स्टिक, छोटे कप, स्ट्रॉ, प्लेट्स, पेले, चमचे दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याचे आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांनी सांगितले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here