Skip to content

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील जोडी झाली खऱ्या आयुष्यातील जोडीदार


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि अंजलीबाई झाले खऱ्या आयुष्यातील जोडीदार. या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच अंजलीबाई आणि अभिनेता हार्दिक जोशी राणादा यांचा ३ एप्रिल मंगळवार रोजी साखरपुडा पार पडला. मालिकेने निरोप घेतल्यानंतरही दोघे नेहमीच चर्चेत होते. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक घराघरांत पोहोचले होते. त्यांची जोडी सर्वांच्या पसंतीची होती. ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत होते. त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. मालिका संपल्यानंतरी ते नेहमी चर्चेत होते. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. आता पुन्हा एकदा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारणही तितकंच खास आहे. कारण, दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.

अक्षया आणि हार्दिक यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळाला होता. फोटोंमधील दोघांची अदा चाहत्यांना आवडली होती. आता त्यांनी साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. हार्दिक जोशीने साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये अक्षया ही हार्दिकच्या मांडीवर बसताना आणि रिंग घालताना पाहायला मिळत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य बरेचकाही सांगून जाते. मालिकेत साकारलेली जोडी आज प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरने फोटो शेअर करताना अहाSS फायनली Engaged असे शब्द टाकलेत. कदाचित रील लाईफ मध्ये जे काही घडले ते खऱ्या आयुष्यात घडेल यावर तिचा विश्वास नसावा. अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. मालिकेतील त्यांची नावही तितकीच गाजली होती. ‘पाठक बाई आणि राणा दा’ अशी नाव त्यांची होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!