Skip to content

ग्राहकांना मिळाला दिलासा , भाजीपाला दरात घट


 

देशात महागाईचा प्रचंड फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यातच आता भाजीपाल्यात दरवाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटो 60 ते 70 रुपये किलो दर झाली होते . दोन-तीन दिवसांपूर्वी दहा ते वीस रुपये ने टोमॅटोचे दर कमी झाली आहे. नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

उन्हात भाजीपाला लवकर खराब होत असल्याने भाज्यांच्याही दर या दिवसात वाढलेले असतात. मार्चच्या सुरुवातीपासूनच लिंबूचे दर दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र आता लिंबाची आवक वाढली आहे, त्यामुळे दरही स्थिर होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे भाव कडाडले आहे.

सध्या राज्यातूनही टोमॅटो आवक बंद झाल्याने किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० ते ७० रुपये किलो झाले आहेत. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. याचबरोबर उन्हाळ्यामुळे काकडीला देखील मोठी मागणी असून दर जास्त आहे. शाळा सुरू झाला की गृहिणी वाळवण करण्यासाठी बटाट्यांचा पदार्थ बनवतात त्यामुळे बटाटा मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारात बटाटा ३० रुपये तर काकडी ४० रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.

असे आहे भाजीपाल्यांचे भाव- वांगे – २०, फुलकोबी २०, पानकोबी – १५, टोमॅटो – ४०, मेथी – ४०, कोथिंबीर- ६०, शिमला मिरची – ६०, हिरवी मिरची – ५०, पालक – २०, भेंडी – ४०, तोंडले – ३०, कोहळे – २०, दुधी भोपळा – १५, मुळा – २०, काकडी – १५, ढेमस – ४०, कारले – ३०, घोळभाजी – २०, बारीक घोळ – ३०, दोडके – ४०, आंबा – ४०, चवळी शेंग – २५.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!