Skip to content

खऱ्या हिंदुत्वाचा आवाज ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर प्रदर्शित.


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : शिवसेनेच्या जाहीर सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून १४ मे रोजी बीकेसी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. “या वेळी ‘खऱ्या हिंदुत्वाचा’ आवाज ऐकायला या” असं सांगत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर रिलीज केला आहे.

शिवसेनेच्या खऱ्या हिंदुत्वाचा आवाज ऐकायला आपल्या सर्वांना याव लागेल असं आवाहन करत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर प्रदर्शित केला आहे. १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे.

दरम्यान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचा मुहूर्त जाहीर केला आहे. १० जून ला शिवसेनेचे आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार असून हा राजनैतिक दौरा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या १४ तारखेला होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित केला आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर राज्यात तणाव पूर्णस्थिती  निर्माण झाली होती. भोंग्याच्या वादावरुन गृहखात्याने आणि पोलिस खात्याने सतर्कता दाखवली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!