Skip to content

काळू आनंदा पवार सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी जगदीश पवार तर उपाध्यक्षपदी पोपट पवार


देवळा : भऊर ता. देवळा येथील काळू आनंदा पवार आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी देवळा बाजार समितीचे संचालक जगदीश काळू पवार यांची तर उपाध्यक्षपदी पोपट सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भऊर येथील काळू आनंदा पवार सोसायटीचे नूतन अध्यक्ष जगदीश पवार , उपाध्यक्ष पोपट पवार आदींसह संचालक मंडळ आदी . ( छाया -सोमनाथ जगताप )

या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे . गुरुवारी( दि १२) रोजी संचालक विजय पवार, जितेंन्द्र पवार, बळवंत, पवार, त्रबक पवार, संजय पवार, साहेबराव पवार, मंदाकिनी पवार, हेमलता पवार, रमेश पवार, कारभारी गरुड, पोपट परदेशी यांच्या उपस्थितीत, निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष पदासाठी जगदीश पवार व उपाध्यक्षपदासाठी पोपट पवार यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नाना पवार, बाळू पवार, मंगेश पवार, संदीप जाधव, रमेश मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक म्हणून सचिव दत्तू पगार यांनी कामकाज पाहिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!