कन्हेरवळ परिसरात कंटेनर आणि ट्रकचा समोरासमोर धडकेने अपघात

0
15

श्रीगोंदा तालुक्यातील कन्हेरवळ येथे कंटेनर आणि एका मालवाहतूक ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात घडला आहे. यात ३ जण गंभीर जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहतूक कंटेनर आणि दौंडकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणारी माल वाहतूक ट्रकची कन्हेरवळ परिसरात समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. दोन्ही वाहनांचा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कंटेनरच्या केबिनचा चुराडा होऊन कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाची प्रकृती गंभीर असल्याने चिंता व्यक्त केली जाते. तर ट्रकचा चालक आणि दोन्ही गाड्यांचे क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. या भागातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही.

परिसरात वाहतुकीची कोंडी झाली असून पोलीस निरीक्षकांच्या सहाय्याने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here