Skip to content

एसी लोकल सेवेत वाढ, रेल्वे प्रशासनाने घेतला आणखी एक मोठा निर्णय


रेल्वे प्र शासनानं मुंबई उपनगरीय एसी लोकलचे प्रवासी भाडे कमी केल्यानंतर प्रवाशांना दिलासा देणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांची लाईफलाइन असणारी एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे या सेवा बंद करण्यात आली.

आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्यात येणार आहे. 5 मेपासून एसी लोकल गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर जास्त लोक प्रवास करू लागले. रेल्वे प्रशासन हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या वेळांमध्ये आता सामान्य लोकल सेवा देणार आहे.

एसी लोकल ट्रेनची सेवा वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे कडक उन्हाळा असल्याचे एसी लोकलची मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची मागणी.सीएसएमटी-कल्याण-टिटवाळा-बदलापूर या महामार्गावर लोकल एसीसेवा वाढवण्याची मागणी होती. तर आता एसी लोकल गाड्यांची संख्या 44 वरून 56 झाली आहे. दुसरीकडे, रविवारी लोकल ट्रॅकवर 14 एसी धावतील, ज्या पूर्वी रविवारी धावत नव्हत्या.

प्रवाशांना एसी लोकलचे तिकीट परवडत असल्याने उन्हाळ्यात प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसी लोकल सेवा वाढविण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी असल्याने आम्ही रेल्वेची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!