मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.राज्यात पुढील तीन ते चार दिवस खडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता व आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या तापमानात वाढ झाली होती परंतु आता सुटका मिळणार आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
प्रति अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज दर्शवण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आहे तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह राज्यातील इतर भागात देखील पाऊस पडण्याची इयत्ता आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम