द पॉईंट नाऊ ब्युरो ; देवळा नगरपंचायत रणधुमाळीत रंगत चढायला सुरुवात झाली असून, विविध पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरात सध्या भाजपातर्फे इच्छुकांनी गर्दी केली आहे त्या तुलनेत महाविकास आघाडीकडे मात्र कमी प्रमाण आहे, निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर मात्र कुठेही चर्चेत नव्हते, त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नव्हती यामुळे मतदारात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या. मात्र उदयकुमार आहेर यांनी आज व्हिडीओ प्रसिध्द करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उदयकुमार आहेर यांची भेट राष्ट्रवादीचे योगेश आबा आहेर व सुनील उर्फ गोटु आबा आहेर यांनी घेतली. यामुळे शिवसंग्राम राज्यातील महायुतीला तिलांजली देऊन महाविकासआघाडी सोबत मैदानात उतरण्याची शक्यता बळावली आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीला बळ मिळेल मैदान गाजवले जाईल ,सभांची राळ उठल्यावर भाजपाला त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता जास्त आहे.
उदयकुमारांनी दोन महिन्यांपूर्वी रामेश्वरपाणी पुरवठा योजना, शाळेच्या जागेवर होणारे गाळ्यांचे बांधकाम, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, बाजार समिती प्रकरण या सर्व प्रकरणांनी वातावरण ढवळून निघाले होते यातील बहुतांश प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहेत, यामुळे उदयकुमारांच्या सभा झाल्यास यांच्यासह अनेक प्रकरण पुराव्यानिशी बाहेर आल्यास भाजपाची गणिते मात्र बिघडू शकतात, याचा अंदाज भाजपा नेतृत्वाला आल्याने, त्यांनी देखील शहरातील काही सुजाण नागरिकांच्या माध्यमातून उदयकुमारांना महायुतीची जाणीव करून दिली जात असून महायुती धर्म पाळावा असे सांगितले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र उदयकुमारांच्या शांततेत काय दडलंय याचा शोध घेतला असता त्यांनी तूर्तास ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले. देवळा तालुक्यात जण + धन सध्या भाजपच्या पारड्यात जास्त असल्याचे चित्र असल्याने विरोधकांना छोटे मोठे पक्ष सोबत घेणं महत्त्वाचे आहे. यात शिवसंग्राम पक्ष छोटा असला तरी तालुक्यात इतक्या प्रखरतेने भाजपाला अंगावर कुठलाही पक्ष घेत नाही म्हणून या पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे.
आज प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपासह राष्ट्रवादीला देखील फैलावर घेतले आहे, यामुळे येत्या दोन दिवसांत कोणासोबत जायचं त्यांचा निर्णय होणार आहे, मात्र त्याआधीच वॉर्ड क्र -14,10,8,11,12 या वॉर्डमध्ये उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एकतर्फी वाटत असलेली निवडणूक सध्या रंगण्याची चिन्हे निर्माण झालेले आहेत.
उदयकुमारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी वडिलांच्या वैद्यकीय कारणास्तव काही दिवस बाहेर होतो, वडिलांचा अपघात झाल्याने ते रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसापासून दाखल आहेत, निवडणुका येतात जातात, मात्र कुटुंब हे जपन महत्त्वाचे आहे. नगरपंचायत निवडणूक ही लढवायची की नाही , किंवा कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याशी बोलून घेतला जाईल यामुळे कोणी नेते माझ्याबद्दल गैरसमज समाजात मतदारात निर्माण करत असल्यास त्यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल.
– उदयकुमार आहेर, प्रदेशाध्यक्ष ,शिवसंग्राम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]
भारतीय जनता पक्ष