तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक काम केल्यास त्या कार्याचा सत्कार आणि सन्मान झाल्याशिवाय रहात नाही. असाच एक सन्मान सटाणा नगर परिषदेत पहावयास मिळाला. निमित्त होते सेवापुर्ती कार्याचे.
सटाणा येथील नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार असलेल्या राजूबाई पोपट पवार या आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत झाल्याने, त्यांचा सेवा पुर्तीनिमीत्त सत्कार आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच कामगार नेते पोपट सोनवणे यांनीही त्यांचा सत्कार केला.
सत्कारानंतर मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी त्यांना आपल्या खुर्चीवर बसवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.एका सफाई कामगार महीलेला मुख्याधिकारी यांनी त्यांच्या खुर्चीवर बसवून त्यांचा सन्मान केल्यानंतर या वेळी उपस्थित सर्व अधिकारी आश्चर्यचकीत झाले. खूर्चीवर बसल्यानंतर राजूबाई पवार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडून त्यांना ग्रहीवरून आले. नगर परिषदेच्या इतिहासत प्रथमच हा सन्मान राजुबाई पवार यांना मिळाला.
राजुबाई पवार या सुरुवातीच्या काळात रोजंदारीवर काम करत होत्या. त्यांना दि.१ /१२/१९९७ रोजी आस्थापनेत कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सेवेत सामावून घेण्यात आले होते. संपूर्ण सेवेत अतिशय प्रामाणिकपणे सेवा केल्याचे फळ त्यांना सेवापुर्ती निमीत्ताने मिळाले.
यावेळी बोलतांना मुख्याधिकारी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात काम करतांना प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्याचा आदर आणि सन्मान हा होत असतो. राजुबाई यांनी सटाणा शहराची जी सेवा केली आहे त्याचा हा सन्मान आहे. सफाई कामगार हा सुद्धा पालीकेचा एक मुख्य घटक आहे. म्हणून प्रत्येक कामगाराने प्रामाणीक पणे काम केल्यास प्रशासन त्याची नेहमी दखल घेत असते. यावेळी कामगार नेते पोपट सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी विजय देवरे ग्रंथपाल ज्ञानेश्र्वर खैरनार, स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे, सचिन जाधव, विनायक पाकळे उपस्थित होते.
ही बातमी वाचलीत का?
देवळा नगरपंचायत रणधुमाळीत रंगत चढायला सुरुवात झाली असून, विविध पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरात सध्या भाजपातर्फे इच्छुकांनी गर्दी केली आहे त्या तुलनेत महाविकास आघाडीकडे मात्र कमी प्रमाण आहे, निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर मात्र कुठेही चर्चेत नव्हते, त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नव्हती यामुळे मतदारात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या. मात्र उदयकुमार आहेर यांनी आज व्हिडीओ प्रसिध्द करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा.
उदयकुमारांनी शड्डू ठोकला ; कोणासोबत जायचं याचा दोन दिवसात निर्णय
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम