हर्षदा कंटे
तु कवितेच आतुर आगमन , अन् माझ्या शब्दांच मौन
तु वात्सल्याचं भव्य प्रदर्शन , अन् मी तुझीच अवखळ चाहूल.
तु संस्कारांची उधळण तर सौख्याचं शिंपण,
ममतेच औक्षण,
अन् मला भरभरून मिळालेल आंदण.
तू कवितेच अपूर्ण पान पण माझ्याच शब्दांचा अट्टाहास
पडत अडखळत का होईना
पण पूर्णत्वाचा हव्यास .
कसा साधु हा शब्दांचा मेळ
आईला शब्दात बांधणं
म्हणजे जरा अवघडच खेळ.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम